संदिपान भुमरेंना १५ टक्के द्यावे लागतात! मजूर सोसायटीच्या चेअरमनचा आरोप

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मजूर सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची प्रचारसभा सुरू असताना, पालकमंत्री संदिपान भुमरे यांना १५ टक्के द्यावे लागतात, असा गंभीर आरोप सोसायटीच्या चेअरमननी केला आहे. या सभेत संदिपान भुमरे यांचे सहकारी मंत्री अब्दुल सत्तार या सभेच्या व्यासपीठावर बसले असताना हे आरोप केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. सत्ताधारी मजूर सहकारी विकास पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ खुलताबाद येथील श्री भद्रा मारोती संस्थान येथे नारळ फोडून आणि जर जरी बक्ष दर्गा येथे चादर चढवून करण्यात आला. त्यानंतर येथील म्हैसमाळ रोडवरील ए वन लॉन्स येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सोसायटीचे चेअरमन म्हणाले की, ‘विकासकामे फक्त मोठमोठ्या लोकांना मिळते. आमच्यासारख्या गरिबांना काहीच मिळत नाही. आमच्या हातात एकही काम आले नाही. आम्ही सर्व चेअरमन फक्त नालावाच चेअरमन आहोत. आमची परिस्थिती खूप गंभीर आहे. अब्दुल सत्तार येथे असल्याने त्यांना सांगणे गरजेचे असून आम्ही त्यांना सांगणार नाही तर कोणाला सांगणार. आमच्या तालुक्याचे जेवढे गोरगरीब चेअरमन आहेत, ते कुठे गेले तर त्यांना इकडे तिकडे पळवले जाते. आमच्या तालुक्याचे आमदार आणि पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे गेलो, तर त्यांना 15 टक्के द्यावे लागते. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी आमच्याकडे लक्ष द्यावे ही विनंती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top