संभाजीनगरमध्ये गॅस टँकर उलटल्याने वायुगळती

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर आज पहाटेच्या सुमारास गॅस टँकरचा भीषण अपघात झाला. यामुळे टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली. काही वेळातच येथील परिसरात उग्र वास पसरल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले.

छत्रपती संभाजीनगर शहरातून जालना रोड गेल्याने सिडको परिसरात नेहमी मोठी वर्दळ असते. आज पहाटे ५ ते ५:३० च्या सुमारास हॉटेल रामगिरीसमोर एचपी गॅस कंपनीचा गॅस वाहून नेणारा टँकर अनियंत्रित झाला आणि उलटला. क्षणार्धात टँकरमधून मोठी वायूगळती सुरु झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने या टँकरवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी या परिसरातील वीजपुरवठा खंडित केला. जालना रोडवरील सिडको चौक ते हायकोर्ट सिग्नलपर्यंतची वाहतूक पूर्णत: बंद केली. नागरिकांनी आपल्या घरातील घरगुती गॅस लाईट शेगडी बंद ठेवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top