संरक्षण मंत्रालयाचा ‘भेल’सोबत ५३०० कोटी रुपयांचा करार

नवी दिल्ली

संरक्षण मंत्रालयाने काल भारतीय लष्करासाठी इलेक्ट्रॉनिक फ्यूज खरेदी करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भारत हेवी इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (भेल) सोबत ५३०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या करार केला. हा करार १० वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला. याबाबत मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक फ्यूज हा मध्यम ते भारी कॅलिबर बंदुकांचा अविभाज्य भाग आहे. बंदुकांमध्ये वापरण्यासाठी फ्यूज खरेदी केले आहेत. या तोफा उत्तरेकडील सीमेवरील उंच भागांसह विविध प्रकारच्या भूप्रदेशात प्राणघातक मारा करण्यास सक्षम आहेत. निर्यात कमी करण्यासाठी दारुगोळा साठा वाढवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. भारतीय उद्योगाकडून भारतीय लष्करासाठी उपकरणे तयार करणे’ या स्वावलंबी भारताच्या संकल्पनेअंतर्गत खरेदीचा करार करण्यात आला आहे. भेलच्या पुणे आणि नागपूर प्लांटमध्ये इलेक्ट्रॉनिक फ्यूजचे उत्पादन केले जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top