सदाशिव अमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील घराला आग

अहमदनगर

दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या अहमदनगर येथील घराला आग लागली. ही घटना काल अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटमध्ये दुपारी २ च्या सुमारास घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळ पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी या घरात राहणाऱ्या महिलेला वाचवले.

सदाशिव अमरापूरकर यांची सुमन अपार्टमेंटमध्ये चार घरे आहेत. आग लागली ते घर त्यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांच्या नावावर आहे. त्यांनी हे घर भाड्याने दिले आहे. आग लागली त्यावेळी भाडेकरू ज्योती भोर घरातच होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना आगीतून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेत ज्योती यांना किरकोळ दुखापत झाली, त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top