Home / News / सदा खोत, पडळकरांचे ईव्हीएम समर्थनार्थ आंदोलन

सदा खोत, पडळकरांचे ईव्हीएम समर्थनार्थ आंदोलन

मुंबई – विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. तर सत्ताधारी महायुतीकडून ईव्हीएमचे समर्थन केले जात आहे. शेतकरी नेते...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई – विरोधकांकडून ईव्हीएमवर वारंवार शंका उपस्थित केली जात आहे. तर सत्ताधारी महायुतीकडून ईव्हीएमचे समर्थन केले जात आहे. शेतकरी नेते सदा खोत आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधान भवनाच्या पायर्‍यांवर ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन केले. यावेळी त्यांनी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडी विरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी सदा खोत म्हणाले की, शरद पवार 2004, 2009 साली निवडून आले. ते देशाचे कृषीमंत्री झाले. तेव्हा ईव्हीएम बरोबर होते. मग आता पवारांना मतपत्रिका का पाहिजेत? आता पवारांना लक्षात आले की, बॅलेटवर मतदान कमी मिळायला लागले तर ते फाडता येते आणि कागद खिशात घालता येतो. त्यामुळे आता बॅलेटच पाहिजे म्हणून शरद पवारांचा खटाटोप सुरू आहे.

Web Title:
संबंधित बातम्या