समीर वानखेडे यांना दिलासा पुनर्विलोकन याचिका फेटाळली

मुंबई- एनसीबीचे मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे यांना कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.कॅट अर्थात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. उपमहासंचालक ज्ञानेश्वरसिंग यांच्यासाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरण उघडकीस आणताना लाच प्रकरणात समीर वानखेडेनी केलेल्या प्रक्रियात्मक त्रुटींच्या चौकशीचे स्थापन केलेल्या पथकाचा भाग असू शकत नसल्याचे कॅटने आपल्या २१ ऑगस्टच्या सुनावणीत म्हटले होते.केंद्र सरकार आणि एनसीबीने वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याआधी त्यांची वैयक्तिक सुनावणी करावी. त्यानंतर आता कॅटने आपल्या आदेशात म्हटले आहे की,वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग यांनी वानखेडे यांनी याप्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यामुळे ते चौकशी पथकाचा होऊ शकलेले नाहीत.कॅटचे अध्यक्ष रणजित मोरे आणि सदस्य आनंद माथुर यांनी सांगितले की,अंमली पदार्थाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ज्ञानेश्वर सिंग यांनी वानखेडे यांच्यावर फक्त देखरेख ठेवली नाही तर तपासाबाबत सूचनाही दिल्या होत्या.

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपाचीही चौकशी सुरू आहे.उल्लेखनीय म्हणजे, आर्यन खान आणि इतर अनेकांना ऑक्टोबर २०२१ मध्ये अंमली पदार्थ बाळगणे, सेवन आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तीन आठवड्यांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर आर्यन खानला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कारण आरोपपत्रात आर्यनचे नावच नाही.या एकंदर प्रकरणात एनसीबीने आपल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नेमली होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top