समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प ४ जानेवारीपर्यंत निविदा मागवल्या

मुंबई – मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येला भविष्यात पाण्याचा पुरेसा पुरवठा करण्यासाठी मनोरी येथे समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे.या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे.पुढील वर्षीच्या ४ जानेवारीपर्यंत यासाठी निविदा भरता येतील.

चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर पाणी निःक्षारीकरण केले जाणार आहे.या प्रकल्पाचा खर्च तीन हजार ५२० कोटी रुपये असणार आहे.या प्रकल्पाच्या संयंत्राचे बांधकाम,प्रचालन आणि परिरक्षण पुढील २० वर्षांसाठी असून ४ जानेवारीपर्यंत निविदा भरता येणार आहेत. येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणीही वाढणार आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी पालिकेने मनोरी येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारीताल १२ हेक्टर जागेवर प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे.

मनोरी येथील या प्रकल्पासाठी एकूण ३५२० कोटी रुपये खर्च येणार आहे.या प्रकल्पात एकूण ४०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी पिण्यायोग्य केले जाणार आहे.पहिल्या टप्प्यात २०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाईल.त्याचप्रमाणे कुलाबा येथे पहिल्यांदाच १२ एमएलडी सांडपाण्यावर अशी प्रक्रिया केली जाणार आहे.पालिकेचा सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग असून त्यासाठी २५० कोटी खर्च येणार आहे. हे पाणीसुद्धा पिण्यायोग्य बनविले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top