‘समृद्धी’वर सलग पाचव्या दिवशी भीषण अपघात! ४ जण जखमी

बुलढाणा

समृद्धी महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून अपघाताची मालिका सुरू आहे. आज सलग पाचव्या दिवशी या महामार्गावर भीषण अपघात झाला. मुंबई कॉरिडॉरल चेंज क्रमांक २८४ वर चालकाला झोप लागल्याने भरधाव कारचे नियंत्रण सुटले आणि कार साईड बॅरियरला धडकली. या अपघातात चार जण जखमी झाले.

याबाबत माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींवर मेहकर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर एक मागून एक अपघात सुरूच आहेत. काल समृद्धीवर झालेल्या अपघातात तीन जणांनी आपले प्राण गमावले होते. त्यातच आज पुन्हा अपघात झाल्याने या अपघातांची मालिका कधी थांबणार? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top