समृद्धी महामार्गावर दोन अपघात! तिघांचा मृत्यू, ९ गंभीर जखमी

बुलढाणा

समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ आज सकाळी काही तासांतच दोन अपघात झाले. या अपघातांमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर, ९ जण जखमी झाले. यातील पहिल्या अपघातात चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगात असलेली कार साईड बेरिअरला धडकली. यात तिघांनी आपले प्राण गमावले, तर ४ जण गंभीर जखमी झाले. ही कार नाशिकच्या दिशेने जात होती.

दुसरी अपघाताची घटना देखील चालकाला डुलकी लागल्यानेच घडली. पुण्याहून नागपूरच्या दिशेने निघालेली कार एका ट्रकला पाठीमागून धडकली. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दोन्ही अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या भीषण अपघातांमध्ये दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top