सरकार माझगाव डॉककडून ६ गस्ती नौका खरेदी करणार

नवी दिल्ली- डेन्मार्ककडून ४२ दशलक्ष डॉलर्सची जहाजबांधणी निर्यात ऑर्डर मिळाल्यानंतर पाचच दिवसांत मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीशी ६ अत्याधुनिक गस्ती नौका खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने नुकताच करार केला.१६१४.८९ कोटी रुपयांचा हा खरेदी करार असून या करारावर संरक्षण मंत्रालयाने स्वाक्षरी केली.

या गस्ती नौका खरेदीमुळे भारतीय तटरक्षक दलाची सुरक्षा क्षमता वाढणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.या सहा गस्ती नौकांपैकी चार नौका तटरक्षक दलातील जुन्या गस्ती नौकांची जागा घेतील तर दोन नौका नव्याने भरती केल्या जातील. या नौका पुढील सव्वा महिन्यात तटरक्षक दलाकडे सुपूर्द केल्या जातील.ही आधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञान जहाजे पाळत ठेवणे,कायद्याची अंमलबजावणी,शोध आणि बचाव,सागरी प्रदूषण प्रतिसाद आणि मानवतावादी सहाय्यासह इतर महत्त्वाच्या क्षमता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.या गस्ती नौका बहुउद्देशीय ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता आणि वायरलेस नियंत्रित रिमोट वॉटर रेस्क्यू क्राफ्ट लाइफबॉय यांसारख्या सुविधांनी सुसज्ज असतील

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top