Home / News / सरसंघचालक भागवत यांनीकाशी विश्वनाथाचे दर्शन घेतले

सरसंघचालक भागवत यांनीकाशी विश्वनाथाचे दर्शन घेतले

वाराणसी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आज सकाळी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. या मंदिरात त्यांनी सुमारे १५...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

वाराणसी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी आज सकाळी काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले. या मंदिरात त्यांनी सुमारे १५ मिनिटे विधी आणि मंत्रजपानुसार दर्शन, पूजा आणि अभिषेक केला. त्यानंतर त्यांनी मंदिर ट्रस्टच्या अधिकाऱ्यांसह काशी धामची भव्यता पाहिली. याठिकाणी सुरू असलेल्या सर्व व्यवस्थेची माहिती घेतली . सरसंघचालक भागवत यांनी काशीच्या बुद्धिजीवींना भेटून त्यांच्याशी संघाच्या विस्ताराबाबत चर्चा केली. काल त्यांनी आयआयटी बीएचयूच्या विद्यार्थ्यांसमोर हिंदुत्व या विषयावर व्याख्यान दिले . यावेळी ते म्हणाले की हिंदू समाजातील सर्व पंथ, जाती आणि समुदायांनी एकत्र यावे. स्मशानभूमी, मंदिर आणि जल हे सर्व हिंदूंसाठी समान असले पाहिजे.

Web Title:
संबंधित बातम्या