सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी

मुंबई

शेअर बाजाराने आज सलग चौथ्या दिवशी तेजी अनुभवली. सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या दिवशी विक्रमी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स ३७६ अंकांनी वाढून ७२,४२६ वर बंद झाला. निफ्टी १२९ अंकांच्या वाढीसह २२,०४० वर स्थिरावला. बाजारातील तेजीत आज ऑटो आणि रियल्टी स्टॉक्स आघाडीवर राहिले. बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३८९.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

सेन्सेक्सवर विप्रो, एम अँड एम, एलटी, मारुती, टाटा मोटर्स, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे शेअर्स तेजीत होते. पॉवर ग्रिड, एसबीआय, रिलायन्स, एनटीपीसी हे शेअर्स घसरले. निफ्टी पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजी राहिली. निफ्टी ऑटो सुमारे २ टक्क्यांनी वाढला. निफ्टी रियल्टी, फार्मा आणि आयटी निर्देशांकही वाढले. निफ्टीवर विप्रो, एम अँड, एसबीआय लाईफ, अदानी पोर्टस, मारुती हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांदरम्यान वाढले. पॉवर ग्रिड, एसबीआय, ब्रिटानिया हे शेअर्स घसरले. टीव्हीएस मोटर कंपनीचे शेअर्स आज एनएसईवर ४ टक्क्यांपर्यंत वाढून २,१८६ रुपयांच्या उच्चांकावर गेले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हे शेअर्स २,१३९ रुपयांवर आले. विप्रो लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग सहाव्या सत्रात वाढ झाली. आज हा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून वाढून ५४५ रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर गेला. त्यानंतर हा शेअर्स ५४२ रुपयांवर स्थिरावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top