Home / News / सांगलीत राष्ट्रवादीच्या माजी महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगलीत राष्ट्रवादीच्या माजी महापौरांचा आत्महत्येचा प्रयत्न

सांगली – सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश पाटील यांनी त्यांच्या नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सांगली – सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते, माजी महापौर सुरेश पाटील यांनी त्यांच्या नेमिनाथनगगर येथील निवासस्थानी साडीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांना तातडीने येथील उषःकाल रुग्णालयात दाखल केले.याठिकाणी त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून आता त्यांनी प्रकृती स्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची प्राथमिक नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली असून पाटील यांनी आत्महत्येचा प्रयत्न का केला याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही .
सुरेश पाटील हे मागील काही महिन्यांपासून काही कारणास्तव राजकारण आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सुरश्री संगीत महोत्सवाच्या उद्घाटनाला मागील रविवारी ६ एप्रिलला ते उपस्थित होते. त्यानंतर काल सकाळी त्यांनी गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी घेतलेल्या टोकाच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क निर्माण झाले आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या