सातारा जिल्ह्यात आणखी १२ मंडलात दुष्काळ जाहीर

सातारा- दोन महिन्यांपूर्वी सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा तालुक्यासह अन्य तालुक्यांतील ६५ मंडलात दुष्काळ जाहीर केला होता. यानंतर शासनाने आणखी १२ मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे.
राज्य शासनाने १६ फेब्रुवारीला राज्यातील नवीन काही महसूल मंडलात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. ज्या महसूल मंडलाचे विभाजन झाले, तसेच नवीन महसूल मंडल निर्माण झाले अशा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आलेले नाही. त्याठिकाणी दुष्काळ जाहीर केला आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील करंजे तर्फ सातारा, कोडोली मंडल अंतर्भूत झाले आहे. तर कराड तालुक्यातील येळगाव, पाटणमधील येराड, आवर्डे, मारुल हवेली, फलटणमधील कोळकी, खटाव तालुक्यातील कलेढोण, भोसरे तर माणमधील वरकुटे मलवडी, आंधळी आणि काेरेगावमधील साप मंडलाचा समावेश आहे.या ठिकाणी आता दुष्काळी सवलती लागू झाल्या आहेत.
सातारा जिल्ह्यात मागच्या वर्षी पर्जन्यमान कमी झाले होते. जून ते सप्टेंबर या चार पावसाळी महिन्यांचा विचार करता सरासरीच्या ७० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली होती. तसेच कोयनेसह अन्य मुख्य धरणांत कमी पाणीसाठा होता. वाई आणि खंडाळ्यासह, माण, खटाव, फलटण, कोरेगाव हे तालुके पूर्वीपासून दुष्काळी आहेत. या तालुक्यांत पाण्यासाठी टँकर सुरू होते. त्यामुळे लोकप्रतिनिधींनीही हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात शासनाने महसूल मंडलात ७५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top