Home / News / सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची दहशत

सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची दहशत

कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

कराड- गेल्या १५ दिवसांपासून सातारा तालुक्यातील सासपडे गावात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे.हा बिबट्या शेतशिवार आणि नागरी वस्तीत वावरताना दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

आतापर्यंत या बिबट्याने गावातील दहा ते बारा कुत्र्यांची शिकार केली असून रात्री बिनधास्त फिरणारा हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.
रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास नागेश रोकडे यांच्या दुचाकीला हा बिबट्या आडवा गेला.बिबट्याच्या भीतीने रात्री गावातील कुणीही घराबाहेर पडण्याचे धाडस करताना दिसत नाही. तरी वनविभागाने याची दखल तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या