साहेब तुम्ही फक्त तब्येत जपा! बजरंग सोनवणेंची भावनिक पोस्ट

बीड

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे शिलेदार आणि बीडमधील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी शरद पवार यांच्यासाठी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. “साहेब आता आम्ही खिंड लढवतो, तुम्ही फक्त तब्येत जपा आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहूद्या.” अशा आशयाची पोस्ट सोनवणे यांनी लिहिली आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीमुळे आजचे त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले. बारामतीमधील शेवटची सभा संपेपर्यंत शरद पवार यांची प्रकृती बरीच बिघडली होती. घसा बसल्यामुळे त्यांना बोलता येत नव्हते. तसेच त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. त्यानंतर शरद पवार गटाने काल रात्री याबाबत अधिकृत घोषणा केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top