सिंगापूरमध्ये कोरोनाचे ५६ हजार नवे रुग्णसिंगापूर

सिंगापूरमध्ये कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले असून या देशात ५६ हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ही आकडेवारी गेल्या आठवड्यातील असून त्यापूर्वी ३२ हजार कोरोना रुग्ण सापडले होते. सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्यानुसार, गेल्या आठवड्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये ७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने १९ डिसेंबरपासून दररोज कोरोनाची माहिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंगापूरमध्ये कोरोनामुळे दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या दररोज सरासरी २२५ ते ३५० इतकी आहे. यापैकी सरासरी ४ ते ९ रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात येत आहे. यातील बहुतेक रुग्ण जेएन १ ने कोरोनाच्या विषाणूने संक्रमित आहेत. कोरोनाचा हा विषाणू फारसा प्रभावी नसला तरी एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला याची लागण होऊ शकते, असे आतापर्यंतच्या निरीक्षणात आढळले आहे. दरम्यान, भारतातही कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र, सध्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. काल भारतात कोरोनाचे ३१२ नवीन रुग्ण आढळले असून, त्यापैकी २८० केरळमधील आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांची लक्षणे फारशी गंभीर नाहीत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशभरात १७,६०५ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top