Home / News / सिंधुदुर्गातील तिलारी २ दिवसांत धरणाचे पाणी नदीत सोडणार

सिंधुदुर्गातील तिलारी २ दिवसांत धरणाचे पाणी नदीत सोडणार

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील तिलारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या धरणातील...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

सिंधुदुर्ग- जिल्ह्यातील तिलारी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात तुफान पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत या धरणातील अतिरिक्त पाणी नियंत्रित पध्दतीने पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीत सोडले जाणार आहे.

सद्या धरणाच्या परिसरात पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे धरण क्षेत्राबाहेरील पाणलोट क्षेत्र तसेच तेरवणमेढे उनैई बंधार्‍यामधील खरारी नाल्यात सोडण्यात येणारे पाणी तिलारी नदीपात्रात येऊन या नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता शक्यता आहे.त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांनी नदीपात्रात उतरू नये,महिलांनी कपडे धुण्यासाठी नदीकाठी नये, अशाप्रकारे सावधगिरी बाळगावी,असे आवाहन तिलारी प्रकल्प विभागीय अधिकारी गजानन बुचडे यांनी केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या