सिक्कीममध्ये अडकलेल्या ८०० पर्यटकांची अखेर सुटका

गंगटोक – खराब हवामान आणि बर्फवृष्टीमुळे पूर्व सिक्कीम उंच भागात ८०० हून अधिक पर्यटक अडकून पडले होते. पूर्व सिक्कीममधील चांगू-नथुला येथे गेलेल्या या सर्व पर्यटकांची भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. या पर्यटकांमध्ये वृद्ध,महिला आणि लहान मुलांचा समावेश होता.

या परिसरात दुपारी हवामानात अचानक बदल होऊन पावसाला सुरुवात झाली. तापमानाचा पारा खाली येताच बर्फवृष्टी सुरू झाली. बर्फवृष्टीमुळे वाहनांची वाहतूक ठप्प झाली आणि हे पर्यटक रस्त्यात अडकले. त्यांना बाहेर काडण्यासाठी रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. अखेर सर्व पर्यटकांना पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले . त्यांना निवास,उबदार कपडे, वैद्यकीय मदत आणि गरम जेवण देण्यात आलो.या पर्यटकांसाठी या सैनिकांनी आपल्या स्वतःच्या बरॅक रिकाम्या केल्या.जवानांच्या तात्काळ कारवाईमुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला.

सध्या सिक्कीममधील हवामानाने गंभीर वळण घेतले आहे आणि बहुतांश भागात प्रचंड थंडी आहे. लाचुंग आणि त्याच्या वरच्या भागांसह उत्तर सिक्कीमच्या काही भागात हिमवर्षाव सुरू आहे.रावंगलासह काही भागात गारपीट झाल्याचीही माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी आलेल्या विनाशकारी फ्लॅश पूरनंतर अधिकाऱ्यांनी अलीकडेच पर्यटकांना सिक्कीमच्या या भागांना भेट देण्यासाठी परवाने देणे सुरू केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top