सिमेंटनंतर सळईच्या दरातही मोठी वाढ! घरे महागणार

मुंबई- घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सिमेंटनंतर आता सळईच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. घराचे काम मजबूत करण्यासाठी प्रामुख्याने सिमेंट आणि सळई गरजेची असते. गेल्या काही महिन्यांत सळईच्या किंमतीत सरासरी १० ते १२ टक्क्यांची वाढ झाली. पावसाळा संपला त्यामुळे दशभरात घरबांधणीच्या कामांना गती मिळत आहे.
त्यानंतर भारतीय पोलाद कंपन्या स्टीलच्या किंमतींमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. कोकिंग कोळशाच्या महागाईमुळे स्टील कंपन्यांना मोठा खर्च सहन करावा लागतो. त्यामुळे स्टील कंपन्या डिसेंबरपर्यंत किंमत वाढीची घोषणा करण्याची शक्यता आहे. स्टीलच्या किंमतीत २ ते ४ हजार रुपये प्रति मेट्रिक टन वाढ होण्याची शक्यता आहे. काही स्टील कंपन्यांनी किंमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. कंपन्यांनी हॉट-रोल्ड आणि कोल्ड-रोड उत्पादनांच्या किंमती २ हजार रुपये प्रति टन वाढवल्या आहेत. या सर्वांच्या वाढत्या किंमतीमुळे घर बांधण्याच्या किंमतींवर परिणाम होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top