सियाचीन ऑपरेशनल पोस्टवर प्रथमच महिला वैद्यकीय अधिकारी

नवी दिल्ली :

सियाचीन ग्लेशियरमधील लष्कराच्या ऑपरेशनल पोस्टवर प्रथमच एक महिला वैद्यकीय अधिकारी तैनात करण्यात आली आहे. फातिमा वसीम असे या महिला अधिकाऱ्याचे नाव असून भारतीय सैन्यदल क्षेत्रात इतिहास घडविला आहे.

यशस्वीरीत्या चढाई करून डॉ. फातिमा आपल्या पोस्टिंगवर तैनात झाल्या आहेत. १५ हजार फुटांहून अधिक उंचीवर त्या जवानांच्या आरोग्यासह देशाच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी सांभाळत आहेत. भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने काल एक्सवर एका पोस्टच्या माध्यमातून भारतीय स्त्रीशक्तीच्या द़ृष्टीने अत्यंत अभिमानास्पद असलेली ही माहिती दिली. फातिमा वसीम यांचा एक व्हिडीओही या पोस्टमधून प्रसिद्ध करण्यात आला आहे. फातिमा या सियाचीन बॅटल स्कूलच्या प्रशिक्षणार्थी आहेत. येथे त्यांनी बर्फाळ उंचीवर गिर्यारोहण व शस्त्रास्त्रांचेही प्रशिक्षण घेतले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top