सीआयडी फेम इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस यांचे निधन

मुंबई

सीआयडी या मालिकेत फ्रेड्रिक्सची भूमिका साकारणारे अभिनेते दिनेश फडणीस यांचे काल रात्री निधन झाले. कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात वयाच्या ५७ व्या वर्षी फडणीस यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने ३० नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. फडणीस यांचे सहकलाकार दयानंद शेट्टी यांनी सांगितले की, फडणीस यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. ते व्हेंटिलेटरवर होते. लीवर, हृदय आणि किडनीसंबंधित समस्यांमुळे फडणीस यांची प्रकृती गंभीर होती.

फडणीस यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील दौलत नगरमध्ये आज अंत्यसंस्कार करण्यात आले. फडणीस यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना धक्का बसला आहे. लोकप्रिय सीआयडी मालिकेत दिनेश फडणीस यांनी फ्रेड्रिक्स ही व्यक्तिरेखा साकारली होती. तब्बल २० वर्षे ते या मालिकेचा भाग होते. सध्या ते मराठी सिनेमांची संहिता लिहित होते. आमिर खानच्या ‘सरफरोश’ आणि हृतिक रोशनच्या ‘सुपर ३०’ या सिनेमांतही ते झळकले आहेत. यासह त्यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय कार्यक्रमातही काम केले आहे. पण गेल्या एका वर्षापासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top