सीएसएमटी ते मऊ दरम्यान२८ उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या

मुंबई- मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मऊ दरम्यान येत्या १० एप्रिलपासून २८ उन्हाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोच्चुवेली साप्ताहिक विशेष गाडीच्या २४ फेर्‍या ११ एप्रिल ते २७ जूनपर्यंत चालवल्या जाणार आहेत.

उन्हाळी सुट्टीत दरवर्षी अनेकजण आपल्या गावी जात असतात. या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वे प्रवाशांसाठी अतिरिक्त गाड्या सोडत असते. त्याचाच एक भाग म्हणून सीएसएमटी ते मऊ २८ गाड्या चालविण्यात येणार आहेत. १० एप्रिल ते १ मेपर्यंत या अतिरिक्त गाड्या चालवल्या जाणार आहेत. ही गाडी सकाळी १०.३५ वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि तिसर्‍या दिवशी सकाळी ११.१० वाजता येथे मऊ येथे पोहचेल. तर पुन्हा ही गाडी परतीसाठी १२ एप्रिल रोजी मऊ येथून १.१० वाजता सुटेल आणि तिसर्‍या दिवशी १२.४० वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल. तसेच एलटीटी – कोच्चुवेली साप्ताहिक विशेष गाडी ११ एप्रिल ते २७ जूनपर्यंत आणि कोच्चुवेली ते एलटीटी दरम्यान १३ एप्रिल ते २९ जूनपर्यंत चाळवली जाणार आहे. उद्या ८ एप्रिलपासून या उन्हाळी विशेष गाड्यांचे ऑनलाइन आरक्षण करता येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top