Home / News / सीबीएसईची १० वी आणि १२ वीची परिक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार

सीबीएसईची १० वी आणि १२ वीची परिक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार

दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

दिल्ली – दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता १० वी आणि १२ वीच्या (२०२५) परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. इयत्ता १२ वीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि पहिला पेपर शारीरिक शिक्षणाचा असणार आहे. तर १० वी बोर्डाच्या परीक्षाही १५ फेब्रुवारीला सुरू होणार असून पहिला पेपर इंग्रजी विषयाचा आहे.यावेळी सीबीएसईने गेल्या काही वर्षांची परंपरा मोडून प्रथम प्रमुख विषयांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. इयत्ता १० वीची परीक्षा १८ मार्चला तर १२ वीची परीक्षा ४ एप्रिलला संपणार आहे. या परीक्षांचे पेपर सकाळी १०.३० वाजता सुरू होतील आणि दुपारी १.३० वाजता संपतील. सीबीएसईने मुख्य परीक्षेचे वेळापत्रक गेल्या वर्षीच्या तुलनेत लवकरच म्हणजे २३ दिवस आधी प्रसिद्ध केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या