सीबीएसई दहावी, बारावीचे सुधारित वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली

सीबीएसई बोर्डाने काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते. आता या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाने आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.त्यानुसार, १५ फेब्रुवारीपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. काही विषयांच्या पेपरच्या परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. इयत्ता दहावीचा तिबेटमधील परीक्षा आता २३ फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. दहावीची रिटेल विषयाची परीक्षा १६ फेब्रुवारीऐवजी आता २८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. याशिवाय बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत. बारावी फॅशन स्टडीजची परीक्षा आता ११ मार्चऐवजी २१ मार्च रोजी होणार आहे. इयत्ता दहावीची परीक्षा १३ मार्चला संपणार आहे, तर बारावीची परीक्षा २ एप्रिलला संपणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top