सुनिता विल्यम्स यांची तिसरी अवकाश वारी पुढे ढकलली

वॉशिंग्टन – भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर नेण्यासाठीची बोईंगची स्टारलाइनर मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. आज सकाळी ८.०४ वाजता फ्लोरिडा येथील केप कॅनाव्हरल स्पेस फोर्स स्टेशनवरून यूएलएच्या ॲटलस व्ही रॉकेटमधून प्रक्षेपित होणार होते. रॉकेटमधील ऑक्सिजन रिलीफ व्हॉल्व्हमध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली.
वयाच्या ५८ व्या वर्षी सुनिता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाश वारी करण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. मात्र तांत्रिक अडचणीमुळे हे उड्डाण पुढे ढकलण्यात आले.
मोहिम पुढे ढकलल्यानंतर अंतराळवीर क्रू क्वार्टरमध्ये परतले. पुढील प्रक्षेपण कधी होणार, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ही मोहीम यशस्वी झाल्यास, इतिहासात प्रथमच अमेरिकेकडे अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी दोन अंतराळयाने असतील. सध्या अमेरिकेकडे फक्त एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आहे.

स्टारलाइनरमध्ये क्रू कॅप्सूल आणि सर्व्हिस मॉड्यूल असे दोन स्वतंत्र भाग आहेत. अंतराळवीर क्रू कॅप्सूलमध्ये राहतील. सेवा मॉड्यूलमध्ये अवकाशात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रणालींचा समावेश आहे. हवा आणि तापमान नियंत्रण, पाणी पुरवठा आदिंची व्यवस्था सर्व्हिस मॉड्युलद्वारे केली जाते. सर्व्हिस मॉड्यूल पुन्हा पुन्हा वापरता येणार नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top