सुनेत्रा सर्वात चांगली सून नवलेंकडून कौतुक

पुणे

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या काल मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. माजी खासदार नानासाहेब नवलेदेखील त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. यावेळी सुनेत्रा पवार यांनी नवलेंची भेट घेतली. या भेटीवेळी तू सर्वात चांगली सून आहेस, असे म्हणत नवलेंनी सुनेत्रा पवारांचे कौतुक केले. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांची पुण्याच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी नवलेंनी सुनेत्रा पवारांना त्यांचा पाठिंबा जाहीर केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top