सुप्रीम कोर्टातील १६ आमदार अपात्रता सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर पडली

मुंबई – सर्वोच्च न्यायालयातील शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर गेली आहे. ही सुनावणी आता ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. यापूर्वी ही सुनावणी आता ९ ऑक्टोबरला होणार होती. मात्र, ती सलग चौथ्यांदा लांबणीवर गेली आहे. आधी न्यायालयाकडून या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आधी ३ ऑक्टोबर, मग ६ ऑक्टोबर आणि त्यानंतर आता ९ ऑक्टोबर आता थेट ३ नोव्हेंबर तारीख देण्यात आली आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सुनावणीसाठी निश्चित वेळापत्रक तयारही केले होते. या वेळापत्रकानुसार आमदार अपात्रतेची सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, त्याच वेळी सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयातील या प्रकरणाची सुनावणी सतत लांबणीवर पडत आहे. संभाव्य वेळापत्रक, कागदपत्रांची तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलटतपासणी या प्रक्रियेला तीन महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आता जानेवारी २०२४ मध्येच या प्रकरणाचा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top