सुभेदार तानाजी मालुसरेंच्या स्मारकाचे उद्या सुशोभीकरण

रायगड- रायगडच्या पोलादपूर येथील उमरठ येथे उद्या नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सुभेदार मालुसरे यांच्या समाधी व स्मारकाच्या सुशोभीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत नरवीर तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी प्रसिध्दीपत्रक जारी करत माहिती दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ५ मार्च रोजी नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधी व स्मारकाच्या सुशोभीकरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री फडणवीस व अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन, उद्योग मंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे हे देखील ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत. उमरठ येथे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top