Home / News / सेंट्रल रेल्वेच्या पथकाने माउंट टोलोलिंग सर केले

सेंट्रल रेल्वेच्या पथकाने माउंट टोलोलिंग सर केले

नवी दिल्ली – सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या पथकाने सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सक्रिय पाठिंब्याने कारगिलमधील माऊंट टोलोलिंग शिखर सर...

By: E-Paper Navakal

नवी दिल्ली – सेंट्रल रेल्वे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स क्लबच्या पथकाने सेंट्रल रेल्वे स्पोर्ट्स असोसिएशनच्या सक्रिय पाठिंब्याने कारगिलमधील माऊंट टोलोलिंग शिखर सर करून अतुलनीय यश मिळविले. कारगिल युद्धावेळी (ऑपरेशन विजय) भारतीय सैन्याने काबीज केलेले माउंट टोलोलिंग हे पहिले शिखर होते.

टोलोलिंग शिखरावरील ही पहिली नागरी मोहीम होती.या पथकाने नियोजित वेळेच्या ९० मिनिटे आधीच ही मोहीम पूर्ण केली. पहाटे पाच वाजता चढाईला सुरुवात करून सकाळी साडेदहा वाजता ही टीम शिखरावर पोहोचली. या टीममधील रोहन कारेकर हे सर्वात प्रथम शिखरावर पोहोचले. हे शिखर सर करणारे ते पहिलेच नागरिक आहेत.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्या सक्षम पाठबळाखाली या अनोख्या उपक्रमाची कल्पना राबवण्यात आली आणि तिला मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेसाठी संरक्षण मंत्रालय आणि भारतीय लष्कराचा सातत्याने आणि अथक पाठिंबा दिला होता.

Web Title:
संबंधित बातम्या