सेंट फ्रान्सिस झेवियरचे पवित्र अवशेष दहा वर्षांनतर दर्शनासाठी खुले

पणजी

जुना गोवा येथील ‘बॅसिलिका ऑफ बॉम जिझस’ चर्चमध्ये असणारे जगप्रसिद्ध सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. ‘गोंयचो सायब’ नावाने प्रसिद्ध असलेले सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेष दर्शनाच्या तयारीला प्रारंभ झाला आहे. २१ नोव्हेंबर २०२४ पासूनच भाविकांना पवित्र अवशेष पाहण्याच्या सुविधा उपलब्ध करूव दिल्या जाणार आहेत. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीची स्थापना केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषाचा भेट सोहळा १० वर्षांनंतर साजर केला जात आहे. यापूर्वी २०१४ मध्ये हा पवित्र अवशेष दर्शन सोहळा पार पडला. यंदा २१ नोव्हेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ या कालावधीत सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेष दर्शन सोहळा साजरा केला जाणार आहे. या सोहळ्याची तयारी आतापासूनच सुरु झाली आहे. या सोहळ्यानिमित्त गोव्यासह बाहेरून अनेक लोक सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेष दर्शनासाठी येतात. या सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अनेक सुविधा उपबल्ध करून दिल्या जाणार आहेत. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे ३ डिसेंबर १५५२ रोजी चीनमधील शांगचुआन बेटावर निधन झाले होते. सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष, जुने गोव्यातील बॅसिलिका ऑफ बॉम जिझस येथे चांदीच्या ताबूतमध्ये जतन केले आहेत. दर दहा वर्षांनी हे अवशेष दर्शनासाठी खुले केले जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top