सेऊलमध्ये ४० वर्षांतील सर्वांत मोठा हिमवर्षाव

सेऊल – दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये गेल्या ४० वर्षांहून अधिक काळातील सर्वात मोठी एक दिवसीय बर्फवृष्टी झाली. मात्र या हिमवर्षावाच्या परिस्थितीत कुणीही जखमी अथवा मृत झाल्याचे वृत्त नाही.

देशाच्या हवामान विभागाने सांगितले की,सेऊलमध्ये शनिवारी एकाच दिवसात १२.२ सेंटीमीटर म्हणजे ४.८ इंच बर्फ पडला,१९८१ नंतरचा हा सर्वात मोठा
हिमवर्षाव असल्याचे बोलले जात आहे.सेऊलशिवाय देशाच्या अन्य भागातही पाऊस आणि बर्फवृष्टी झाली.रस्त्यावर अनेक ठिकाणी बर्फाचे ढीग असल्याने मोठी वाहतूककोंडी झाली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top