सेन्सेक्स पहिल्यांदाच ७५ हजारांवर बंद

मुंबई :

शेअर बाजारात आज बँकिंग शेअरमधील तेजीमुळे निफ्टीने २२,७७५ चा नवीन विक्रमी उच्चांक नोंदवला. त्यानंतर निफ्टी १११ अंकाच्या वाढीसह २२,७५३ वर स्थिरावला. तर सेन्सेक्स ३५४ अंकांनी वाढून ७५,०३८ वर बंद झाला.

सेन्सेक्सने आज ७५ हजारांच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार केला. सेन्सेक्सवर आज आयटीसी, कोटक बँक, भारती एअरटेल, एसबीआय, एशियन पेंट्स, रिलायन्स, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया हे शेअर टॉप गेनर्स राहिले. तर मारुती, एलटी, एचडीएफसी बँक, एम अँड एम या शेअरमध्ये घसरण दिसून आली. निफ्टीने आज २२,७७५ चा नवा उच्चांक गाठला. निफ्टीवर कोल इंडिया, बीपीसीएल, हिंदाल्को, कोटक बँक, आयटीसी हे शेअर सर्वाधिक वाढले. तर एचडीएफसी लाईफ, डिव्हिज लॅब, सिप्ला, मारुती, श्रीराम फायनान्स हे शेअर १ ते २ टक्क्यांनी घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top