सेन्सेक्स ३८३ अकांनी घसरला ३ दिवसांत ११ लाख कोटींचे नुकसान

मुंबई

शेअर बाजारात आज सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. सेन्सेक्स ३८३ अंकांनी घसरून ७३,५११ वर बंद झाला. निफ्टी १४० अंकांच्या घसरणीसह २२,३०२ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घसरणीमुळे गुंतवणुकदारांचे नुकसान झाले. सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण झाली. शेअर बाजारात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सेन्सेक्सवर हिंदुस्तान युनिलिव्हर, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टीसीएस, आयटीसी, विप्रो, इन्फोसिस, कोटक बँक हे शेअर्स तेजीत राहिले. तर पॉवर ग्रिड, टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, एम अँड एम, टाटा स्टील, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक एचसीएल टेक, रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले. निफ्टीवर हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, टेक महिंद्रा, नेस्ले इंडिया, टीसीएस हे शेअर्स सर्वाधिक वाढले. बजाज ऑटो, पॉवर ग्रिड, हिंदाल्को, सिप्ला आणि श्रीराम फायनान्स हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top