सोनिया गांधींना तेलंगणातून लोकसभा लढण्यासाठी आग्रह

हैदराबाद-तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे उत्साही झालेल्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधींना २९२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील १७ लोकसभा जागांपैकी कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे. तेलंगणा काँग्रेसच्या राजकीय घडामोडी समितीने म्हणजे पीएसीने आपल्या बैठकीत यासंदर्भात एक ठरावही मंजूर केला आहे.

तेलंगणा काँग्रेसला वाटते की,’सोनिया गांधी यांनी तेलंगणातून निवडणूक लढवल्यास सर्वात जुन्या पक्षाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर निर्माण झालेली गती कायम राखण्यास मदत होईल. काँग्रेस नेते अनेकदा सोनियांना ‘तेलंगणा थल्ली’ असेही म्हणताना दिसतात.

दरम्यान,सोनिया गांधी यांनी यापूर्वी दोन जागांवर निवडणूक लढवली आहे. यापूर्वी १९९ च्या लोकसभा निवडणुकीत सोनियांनी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि कर्नाटकातील बेल्लारी या दोन जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या होत्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top