सोने प्रथमच ७२ हजार पार फक्त ३ महिन्यात ८,७४६ रु वाढ

मुंबई
आज, बुधवारी सोन्याने पुन्हा एकदा सार्वकालिक उच्चांक गाठला. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) च्या वेबसाइटनुसार, १० ग्रॅम सोने आजच्या व्यवहारादरम्यान २१६ रुपयांनी महागून ७२,०४८ रुपये झाले आहे.
चांदीनेही आज नवा उच्चांक गाठला असून एक किलो चांदीचा भाव ३६८ रुपयांनी वाढून ८२,४६८ रुपये झाला आहे. मंगळवारी चांदीचा दर ८२,१०० रुपये होता. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसांत तिच्या किमतीत आणखी वाढ होऊ शकते.
या वर्षी केवळ ३ महिन्यांत सोन्याच्या भावात ८,७४६ रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याचा भाव १ जानेवारीला असलेल्या ६३,३०२ प्रति ग्रॅमवरून आज ७२,०४८ रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे चांदीचा दरही जानेवारीतील ७३,३९५ रुपये प्रति किलोवरून ८२,४६८ रुपये प्रति किलोवर पोहोचला.
सराफा बाजार तज्ज्ञांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा दर ७५ हजार रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो. त्याचबरोबर चांदीचा दरही ८५ हजार रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचू शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top