सोमनाथ मंदिर परिसरातील अतिक्रमणे सरकराने हटवली

गांधीनगर

गुजरात येथील गिर सोमनाथ जिल्ह्यात सरकारने अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत सोमनाथ मंदिराच्या परिसरातील सुमारे ३ हेक्टर जागेवरील अतिक्रमणे राज्य सरकारने हटवली आहेत. यामध्ये २१ पक्के घरे आणि १५३ झोपड्यांचा समावेश होता. ही बांधकामे असलेली जमीन मंदिर ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या मालकीची आहे, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनाधिकृत बांधकामे हटविण्याच्या कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पाच मामलतदार आणि सुमारे १०० महसूल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी हरजी वाधवानिया यांनी सांगितले की, सोमनाथ मंदिर आणि राज्य सरकारचे व्यवस्थापन करण्याऱ्या श्री सोमनाथ ट्रस्टच्या मालकीची जमीन रिकामी करण्यासाठी २१ अनधिकृत घरे आणि १५३ झोपड्या पाडण्यात आल्या. घरे व झोपड्या पाडण्याची मोहीम काल सकाळपासून सुरू होती. ही बांधकामे मंदिर परिसरातील सुमारे ३ हेक्टर जागेवर होती. आता ही अनधिकृत बांधकामे हटविण्यात आल्यामुळे ही सर्व जागा अतिक्रमणमुक्त झाली आहे. राज्य महसूल विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार या जागेवर कुंपण केले जाणार आहे. या मोहिमेपूर्वी २५ जानेवारी रोजी आम्ही अतिक्रमणधारकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली आणि संपूर्ण प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा केली.

गिर सोमनाथ जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मनोहरसिंग जडेजा म्हणाले की, कारवाई सुरळीत पार पडावी यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. ही मोहीम सायंकाळपर्यंत सुरु होती. यावेळी परिसरात प्रवेश आणि बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी, जलद कृती दल आणि क्विक रिस्पॉन्स टीम यांचे पथक देखील सज्ज ठेवण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top