सोमवारपासून नाशिकचे रस्ते यांत्रिकी झाडूने स्वच्छ करणार

नाशिक – महापालिकेने इटलीहून खरेदी केलेल्या यांत्रिकी झाडूंद्वारे नाशिक शहरात रस्त्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. नाशिक महानगरपालिकेने इटलीहून ३३ कोटी रुपयांचे चार यांत्रीकी झाडू खरेदी केले आहे.सोमवारी ४ नोव्हेंबर पासून या यांत्रिकी झाडूद्वारे स्वच्छता सुरु केली जाणार आहे.
एका यांत्रिकी झाडूमार्फत साधारण ४० किलोमीटर प्रतिदिन १६० किलोमीटर रस्त्याची साफ सफाई केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त अनुदानातून महापालिकेने रस्त्याच्या स्वच्छतेसाठी 33 कोटींचे चार यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. गेली दोन वर्ष नविदा प्रक्रिया लांबवल्यानंतर एप्रिल २०२३ मध्ये यंत्र पुरवठ्यासाठी मुक्तेदार कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. यंत्रपुरवठा करण्यासाठी ऑक्टोंबर अखेर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. इटलीहून यंत्रे मागविण्यात आल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाकडे या वाहनांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top