सोमवारी पंतप्रधान उमेदवारी अर्ज भरणार

वाराणसी- पंतप्रधान मोदी हे 2019 नंतर ही लोकसभा निवडणूक वाराणसीतून लढणार आहेत. येत्या सोमवारी 13 मे रोजी प्रचंड शक्तिप्रदर्शन करीत नरेंद्र मोदी वाराणसीत उमेदवारी अर्ज भरतील.
पंतप्रधान मोदी प्रथम बनारस हिंदू विद्यापीठ येथील मदन मोहन मालवीय यांना अभिवादन करून रोड शो ला सुरुवात करतील. काशी विश्वनाथ कॉरीडोरपर्यंत रोड शो करून पंतप्रधान उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील सर्व मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. भाजपाचे लाखो कार्यकर्ते सहभागी होतील. वाराणसीचे भाजपाचे विभागीय अध्यक्ष दिलीप पटेल यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी आहे.
2014 साली नरेंद्र मोदी हे गुजरातमधील बडोदा आणि उत्तर प्रदेशचे वाराणसी या दोन्ही मतदारसंघातून निवडणूक लढले होते. 2019 साली मात्र त्यांनी फक्त वाराणसीतून अर्ज भरला. यावेळी ते वाराणसीचेच उमेदवार असणार आहेत. वाराणसी मतदारसंघात वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कॅन्टोन्मेंट, रोहानिया आणि सेवापुरी हे पाच विधानसभा क्षेत्र आहेत. वाराणसी लोकसभा मतदारसंघात 1 जून रोजी मतदान होणार आहे.
2019 च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे उपस्थित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली वाराणसी येथून उमेदवारी अर्ज भरला तेव्हा मित्रपक्षाचे नेते म्हणून उध्दव ठाकरे, नितीशकुमार आणि रामविलास पासवान हे विशेष उपस्थित होते. आता मात्र चित्र बदलले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top