सोमालियाजवळ जहाजाचे अपहरण १५ भारतीय कर्मचारी अडकले

मोगादिशू :

अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एक जहाजाचे अपहरण करण्यात आले असून या जहाजामध्ये १५ भारतीय कर्मचारी असल्याची माहिती आहे. एमव्ही लीला नॉरफॉक नावाच्या या जहाजाचे सोमालियाच्या सागरी हद्दीजवळ अपहरण करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने याची गंभीर दखल घेत आयएनएस चेन्नई ही आपली युद्धनौका अपहृत जहाजाच्या दिशेने रवाना केली. ही परिस्थिती हाताळण्यासाठी नौदल सज्ज असल्याचेही भारताने म्हटले आहे.

भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती गुरुवारी संध्याकाळी मिळाली. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झाल्यानंतर या जहाजावर लायबेरियाचा झेंडा लावण्यात आला आहे. भारतीय नौदल या जहाजावर लक्ष ठेवून आहे. कर्मचार्यांसोबत दळणवळणही स्थापित करण्यात आले आहे. सर्व क्रू मेंबर जहाजामध्ये सुरक्षित आहेत.

सोमालियाच्या किनाऱ्याजवळ काही दिवसांपूर्वीच सोमालिया येथील समुद्री चाच्यांनी अरबी समुद्रात माल्टा येथील जहाज एमव्ही रुएनचे अपहरण केले होते. या घटनेची माहिती मिळताच भारतीय नौदलाने या जहाजाच्या मदतीला नौदलाने एक युद्धनौका आणि विमान पाठवले होते. त्यानंतर भारतीय नौदलाने या जहाजाची सुटका केली होतेी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top