सोलापूर
राज्यात मे महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्य आग ओकत असून तापमानाचा पारा चढतच चालला आहे. आज सोलापूरात ४४.४ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली.त्यामुळे सोलापूरकरांना कडक उष्म्याच्या लाटेचा सामना करावा लागला. ३० एप्रिलला सोलापूरचे तापमान ४४ अंश सेल्सियस इतके होते. सोलापुरात सलग दोन दिवस ४४ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्याने लोक त्रस्त झाले आहेत.