Home / News / सोलापुरात ट्रक-दुचाकीधडकेत महिलेचा जागीच मृत्यू

सोलापुरात ट्रक-दुचाकीधडकेत महिलेचा जागीच मृत्यू

पोखरापूर – सोलापूरच्या पोखरापूरमध्ये मोहोळजवळील बाजार समितीसमोरील पुणे – सोलापूर महामार्गावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठिमागून धडक दिली. या अपघातात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पोखरापूर – सोलापूरच्या पोखरापूरमध्ये मोहोळजवळील बाजार समितीसमोरील पुणे – सोलापूर महामार्गावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला पाठिमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.मैना कुमार वाघमारे असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्तात्रय महादेव मांजरे आणि मैना वाघमारे या आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास बांधकाम साहित्य आणण्यासाठी दुचाकीवरून सोलापूरला चालले होते. पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात दुचाकी चालक दत्तात्रय मांजरे किरकोळ जखमी झाले. तर मैना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title:
संबंधित बातम्या