सोलापुरात पोलिसाने स्वत:वर गोळी झाडली

सोलापूर – जिल्ह्यात एका पोलीस शिपायाने स्वत:वर गोळी झाडून घेऊन आपले जीवन संपवले. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस शिपाई राहुल अरुण शिरसट (४०) असे मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

पोलीस शिपाई शिरसाट हे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यावर गार्ड ड्युटीसाठी होते. आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास ड्युटी पूर्ण करून घरी जाऊन त्यांनी त्यांच्या एसएलआर बंदुकीतून स्वत:वर गोळी मारून घेतली. ही घटना समजतात वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्‍यान शिरसाट यांच्या जीवन संपवण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top