सोलापुरात रिक्षाला कारची धडक! विद्यार्थिनीचा मृत्यू

सोलापूर- सोलापुरात विद्यार्थ्यांनी भरलेल्या रिक्षाला एका भरधाव कारने धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाला. भाग्यश्री निवृत्ती कांबळे (१७) असे तिचे नाव आहे. या भीषण अपघातात आणखी दोन विद्यार्थी जखमी झाले. ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी आणि आदित्य सुनील भोसले अशी त्यांची नावे आहेत. ही घटना काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासमोर घडली.
काल विद्यार्थ्यांना घेऊन एक रिक्षा निघाली होती. यावेळी रिक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठासमोर पोहोचली असता, रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे भाग्यश्री रिक्षातून बाहेर फेकली गेली आणि सर्व्हिस रोडवर आपटली. यात ती गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. यात जखमी झालेल्या इतर दोन विद्यार्थ्यांना सोलापुरातील खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अज्ञात कार चालकाविरोधात सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top