सोलापुरात सहलीच्या बसला अपघात! शिक्षकाचा मृत्यू

सोलापूर

सोलापूर जिल्हात माळशिरस तालुक्यात वटपळी गावा नजीक बावडा येथील शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीस गेलेल्या एस.टी.ला टेम्पोने मागून धडक दिली. या अपघातात एका शिक्षकाचा मृत्यू झाला झाला असून अन्य एक शिक्षक जखमी आहे. बाळकृष्ण हरिभाऊ काळे असे मृत्यूमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव आहे. हा अपघात आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास घडला.

बावडा येथील शिवाजी विद्यालयाची शैक्षणिक सहल कोकणात गेली होती. तेथून परतत असताना एस टी बसचा अपघात झाला. या अपघातामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात झालेल्या मार्गावर देखील काही काळ गोंधळ उडाला होता. मात्र या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना इजा झाली नाही. मात्र, या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना इजा झाली नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top