स्पाइसजेटच्या विमानात बॉम्ब ठेवल्याच्या फोनमुळे खळबळ

नवी दिल्ली-बिहारमधील दरभंगा येथून दिल्लीला येत असलेल्या विमानात बॉम्ब असल्याचा फोन बुधवारी दिल्ली विमानतळावर आला.प्रोटोकॉलनुसार सर्व खबरदारी घेण्यात आली आणि विमानाची तपासणी करण्यात आली. मात्र, यामध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही.पोलिस आता फोन करणाऱ्याचा शोध घेत आहेत.

स्पाईसजेटच्या आरक्षण कार्यालयाला दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या एसजी ८४९६ या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती.संध्याकाळी ६ वाजता विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरले. स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की,इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियंत्रण कक्षात एक फोन कॉल आला.कॉलरने दरभंगाहून दिल्लीला येणाऱ्या स्पाईसजेटच्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती. हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते.मात्र,चौकशीत हा कॉल बनावट असल्याचे निष्पन्न झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top