स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार नीता अंबानी यांना

नवी दिल्ली

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी यांना सीआयआय स्कोअरकार्ड २०२३ कार्यक्रमात ‘स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर – फिमेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना काल नवी दिल्लीत भारताची क्रीडा कथा पुढे नेण्यासाठी त्यांच्या नेतृत्वासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रिलायन्स फाऊंडेशनला क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचा दर्जा स्थापित करण्यासाठी ‘भारतातील सर्वोत्कृष्ट कॉर्पोरेट प्रमोटिंग स्पोर्ट्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्यात बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांना त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट क्रीडा व्यवसाय प्रमुख पुरस्कार देण्यात आला. रॉयल चॅलेंजर बंगलोरला स्पोर्ट्स फ्रँचायझी ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर खेळांना प्रोत्साहन देणारे सर्वोत्कृष्ट राज्य म्हणून तामिळनाडूचा गौरव करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top