स्फोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर नष्ट करण्यात जवानांना यश

गडचिरोली

गडचिरोलीतील टिपागड परिसरात सी६० ची एक तुकडी आणि सीआरपीएफची एक क्यूएटी यांच्यासह बॉम्ब शोधक व नाशक विभागाच्या (बीडीडीएस) २ पथकांना आज स्फोटकांनी भरलेले ६ प्रेशर कुकर, डिटोनेटर, ३ क्लेमोर पाईप्स आणि श्रापनेल्स सापडले. शिवाय त्याच ठिकाणी आणखी ३ स्फोटकविरहित क्लेमोअर पाईप आणि प्लास्टिकच्या पिशवीत गनपावडर, औषधे आणि ब्लँकेटही सापडले. यावेळी बीडीडीएस टीमने एकूण ९ आयईडी आणि ३ क्लेमोर पाईप घटनास्थळी नष्ट केले. तर उर्वरित साहित्य जाळून टाकले. ही पथके स्फोटके आणि मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी टिपागड परिसरात गेली होती.

दरम्यान नक्षलवाद्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीआरपीएफ तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाची दोन पथके टिपागड परिसरात गेली. या पथकातील जवानांनी डोंगरावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माईन्स आणि प्रेशर कुकर्स शोधून काढले आणि ते नष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top