स्लोव्हाकियाच्या राष्ट्रपतीपदी पीटर पेलेग्रिनीं

ब्रातिस्लाव्हा –
स्लोव्हाकियाचे संसद अध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांनी पश्चिम समर्थक इव्हान कोरकोक यांच्या विरोधात विजय संपादन केल्यावर त्यांची स्लोव्हाकियाच्या राष्ट्रपतीपदी नियुक्ती करण्यात आली. या निकालामुळे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्या सत्तारूढ आघाडी सरकारला कामकाजाचे पूर्ण नियंत्रण प्राप्त होईल. पेलेग्रिनी यांना ५३ टक्के तर त्यांचे विरोधक कोरकोक यांना ४७ टक्के मते प्राप्त झाली. हा विजय म्हणजे आपल्यासाठी खूप मोठे पाठबळ असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top