स्वतःच्या मुलाची हत्या करणाऱ्या सूचनाच्या कोठडीत १४ दिवस वाढ

पणजी- आपल्याच चार वर्षाच्या चिन्मय नावाच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी त्याची आई सूचना सेठ हिची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली आहे.काल तिची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. त्यानंतर कळगुट पोलिसांनी तिला बाल न्यायालयात हजर केले होते.
७ जानेवारीच्या रात्री सिकेरी-कांदोळी येथील हॉटेलमध्ये सूचना सेठ हिने
स्वतःच्या चार वर्षांच्या चिन्मयची हत्या केली. त्यानंतर तिने मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून गोव्यातून भाड्याच्या कारने बंगळुरुला पळून जाण्याचा प्रपत्र केला. परंतु कळंगुट पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती कर्नाटक पोलिसांच्या तावडीत सापडली त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी तिला अटक करून गोवा पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तिला प्रथम म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात उभे केले,त्यावेळी म्हापसा न्यायालयाने तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्यानंतर न्यायालपाने तिला न्यायालयीन कोठडी ठोठावली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top